विठू माझा लेकुरवाळा - vithu maza lekurwala lyrics
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा ||धृ|| निवृत्ती हा खांद्यावरी,सोपानाचा हात धरी ||१|| पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर ||२|| गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ||३|| बंका वंका कडेवरी, नामा करांगुळी धरी ||४|| जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा ||५||