तीन शिरे सहा हात - Tin shire saha haat lyrics
तीन शिरे सहा हात | तया माझा दंडवत ||धृ||
काखे झोळी पुढे श्वान | नित्य जानव्हीचे स्नान ||१||
माथा शोभे जटाभार | अंगी विभूती सुंदर ||२||
शंख चक्र गदा हाती | पायी खडावा गर्जती ||३||
तुका म्हणे दिगंबर | तया माझा नमस्कार ||४||
Comments
Post a Comment