सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमु लागला बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला आला आला माझा गणराज आला मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे रूप करुणा सागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप दर्शनाने त्याच्या जाते सर्वदैन्यदुख चिंता मुक्त होऊनिया मिळे हर सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला आला आला आला माझा गणराज आला भक्तीमधे न्हाऊन भक्त झाले ओले चिंब गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग सान थोर दंग सारे उडवीती रंग आनंदाच्या डोहिफुले आनंद तरंग वाऱ्याचा सुगंध मंद सांगे ज्याला त्याला आला आला आला माझा गणराज आला
वारकरी पंढरीचा I धन्य धन्य जन्म त्याचा II धृ II नेमे जाय पंढरीसी I कदा न चुके त्या नामासी II १ II त्या आषाढी कार्तिकी I सदा नाम गाय मुखी II २ II एका जनार्दनी करी वारी I धन्य तोचि बा संसारी II ३ II
Comments
Post a Comment