आज गोकुळात रंग खेळतो हरी - Aaj gokulat rang khelato hari lyrics

आज गोकुळात रंग खेळतो हरी, 
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी ||धृ||

तो चकोर चित्त चोर वाट रोखतो,
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो,
रांगवूनी रंगुनी गुलाल फसतो,
सांगते अजूनही तुला परोपरी ||१||
राधिके जरा जपून.....

सांग श्याम सुंदरास काय जाहले?
रंग टाकल्या वीणा कुणा न सोडले,
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी ||२||
राधिके जरा जपून.....

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्यात वाजला
हाय वाजली फिरून तीच बासरी ||३||
राधिके जरा जपून.....

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा