अवघे गरजे पंढरपूर - avaghe garaje pandharpur lyrics

अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ||धृ||

टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, 
चालला नामाचा गजर ||१||

इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, 
चालला नामाचा गजर ||२||

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा