दत्त माझा भाव दत्त माझा देव - datt maza bhav lyrics
दत्त माझा भाव, दत्त माझा देव |
दत्त अनुभव अंतरीचा ||
दत्त माझे ध्यान, दत्त माझे ज्ञान |
दत्ताविन आन विश्व नाही ||
दत्त नाम श्रवण, दत्त ध्यान मनन |
दत्त भजनी मौन सहजची ||
दत्त माझी भक्ती, दत्त माझी मुक्ती |
दत्तस्मरणी विरती अनासाये ||
दत्तपदी जनन, दत्तरुपी मरण |
दत्तापाई शरण जिवे भावे ||
दत्त निराकार, दत्तची साकार |
दत्त गुरूवर बाळ माझा ||
- पंत बाळेकुंद्री महाराज
Comments
Post a Comment