निघालो घेवून दत्ताची पालखी - Nighalo gheun dattachi palakhi lyrics

निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, 
झु लते हळूच दत्ताची पालखी ||धृ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, 
झुळूक कोवळी चंदना सारखी ||१||

सात जन्माचि ही लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, 
शांतमाय मूर्ती पाहटे सारखी ||२||

वाट वळणाची जिवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, 
डोळीयांत गंगा जाहली बोलकी ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा