देखोनिया तुझ्या रूपाचा आकार - dekhoniya tuzya rupacha akar lyrics
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार,
उभा कटीकर ठेवोनिया ||धृ||
तेणे माझ्या चित्ती झाले समाधान,
वाटते चरण ण सोडावे ||१||
मुखी गातो गीत वाजवितो टाळी,
नाचत राहुली प्रेमे सुख ||२||
तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे,
तुच्छे हे बा पुढे सकळही ||३||
Comments
Post a Comment