माझे पुण्य फळा आले - Maze puny Phala ale lyrics
माझे पुण्य फळा आले, आज मी दत्तगुरू पाहिले ||धृ||
शंखचक्र करी विराजित ते, पद्मकमंडलू हाती शोभते
भस्मांकित तनु गोजिरवाणी, यातिवेषे सजले ||१||
गळा माळ ती हाती झोळी, मुख कमलाची दिव्य झळाळी
स्वर्गसुखाची भेट आज ही, धन्य जीवन झाले ||२||
दिनांचा गुरुराज दयाळू, भक्तांसाठी होत कृपाळू
जटाधारी परब्रम्ह सावळे, पाहुनी मन धाले ||३||
Comments
Post a Comment