धरीला पंढरीचा चोर - dharila pandharicha chor lyrics
धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ||१||
हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला ||२||
शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी ||३||
सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला ||४||
जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला ||५||
Comments
Post a Comment