यारे नाचू प्रेमानांदे - yare nachu premanande lyrics
यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद ||धृ||
जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे ||१||
चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान ||२||
झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी ||३||
आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता ||४||
विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे ||५ |
Comments
Post a Comment