Posts

Showing posts from July, 2024

संता नाही नाती गोती - Santa nahi nahi goti

संता नाही नाती गोती, संपल्या पोटी जन्मे मोती ||धृ|| ताका पोटी जन्मे लोणी, न मिळविता मिळे दोन्ही ||१|| तरटी कपोनी केला कागद, नाव ठेविले गीता भागवत ||२|| तुका म्हणे देवा, संत पोटी जन्म व्हावा ||४||

शेवटची पारी एकच मनुष्य जन्म फेरी - shevatchi pari

शेवटची पारी एकच मनुष्य जन्म फेरी || चुकलीया वर्म फेरा पडे | याच जन्मी ओळखी करा आत्माराम || संसारी असावे  असूनही नसावे | भजन करावे वेळोवेळा || नामा म्हणे त्यांचं होईना मी दास | घेऊन सुदर्शन सांभाळ करी ||

शेवटीची विनवणी - shevatachi vinavani lyrics

शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥ पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥ तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥

ये ग ये ग विठाबाई - ye g ye g vithabai lyrics

ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ||धृ|| भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा  ||१|| इतुक्यासहित त्वां बा यावे माझे रंगणी नाचावे ||२|| माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी ||३||

बाई ग तुझा कृष्ण कान्हा - Bai g tuza krushn Kanha lyrics

बाई ग तुझा कृष्ण कान्हा, बाळ तान्हा  घालितसे रोज धिंगाणा ||धृ|| कुणी म्हणे यशोदेचा, कुणी म्हणे देवकीचा ||१|| कुणी म्हणे नंद राजाचा, कुणी म्हणे वसुदेवाचा ||२|| कुणी म्हणे रधिकेचा, कुणी म्हणे गोपिकेचा ||३|| तुका म्हणे सारंगपाणी, याची लीला त्रिभुवनी ||४||

हौस भारी माझ्या मनाला - hous bhari Mazya manala lyrics

हौस भारी माझ्या मनाला, माझ्या मनाला  त्या देवाला जायची, त्या देवाला जायाची  विठुरायाची पांडुरंगाची पंढरी बघायची ||धृ|| भक्त पुंडलिकासाठी, मूर्ती सावळी हो आली  श्री ज्ञानोबा भेटती, त्या पिंपळाच्या खाली  देहू गावी, भेट घ्यायची, त्या तुकोबारायाची ||१|| थोर चंद्रभागे तिरी, एकनाथाची कावड  त्या सावंता माळ्याच्या, मला भाजीची आवड  तुकोबाला, नामदेवाला, हार फुले व्हायाची ||२|| विष्णू देवाने तारिले, त्या भक्त प्रल्हादाला  तसा तारील हो मजला, माझा पांडुरंग मला  श्रीरंगाला, गोपाळाला, इच्छा ही सांगायची ||३||

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला - janbai abhang

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ||धृ|| वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला ||१|| हुतू तुतू आट्या पट्या आणि लगोरी गोट्या डाव मांडीला ||२|| या या संतांचा पंथांचा बालगोपाळाचा डाव मांडला ||३|| जनी म्हणे, जने म्हणे खेळ खेळू तुझ्या गुणी डाव मांडीला ||४||

मी उघडताच खिडकी - mi ughadtach khidaki lyrics

मी उघडताच खिडकी, साई दर्शन मज व्हावे माझ्या घरा... माझ्या घरा... माझ्या घरासमोर साईनाथ तुझे मंदिर असावे || धृ || तुझी आरती होताना, साईशब्द यावा कानी मी डोळे मिटताना, तुझी मूर्ती यावी ध्यानी  साई भजन म्हणताना तु भजनाला यावे मी उघडताच खिडकी साईदर्शन मज व्हावे ॥१॥ तु येता जाताना, मज दिसावा बाबा तुझ्या जवळ तीर्थ सारी, आहे काशी काबा  मी दास तुझा साई तु मालक बनाने मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे ॥२॥ जो तुज जवळी आला, तो साई तुझा झाला  जीवनामध्ये त्याच्या, ना काही कमी त्याला  तुझ्या पालखीत फकिराला तु शिर्डीला न्यावे मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे ॥ ३ ॥

जाऊदे घट भरण्या यमुनेला - jaudet ghat bharnya yamunela lyrics

जाऊदे घट भरण्या यमुनेला, मला रे अडवू नको नंदलाला ||धृ|| पिचकारी मध्ये भरुनी रंग,  रंगाने माझे भिजवले अंग ||१|| डोईवर माझ्या दुधाचा माठ,  घट चढताना दुखतीया पाठ ||२|| एका जनार्दनी गौळण राधा,  राधा लागली हरी चरणाला ||३||

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी - yamunechya tiri lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।। बारा सोळा गौळ्याच्या नरी । त्या नटूनी चालल्या मथूरे बाजारी । त्याने मारला खडा न माझा फोडला घडा । त्याने फोडिल्या घागरी ।।१।।   यशोदा बोले बाळ श्रीहरी । छेडू नको रे गोकूळ नगरी । राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी । राधा झाली ग बावरी ।।२।। एका जनार्दनीं गवळण राधा ती विनवी तुजला अरे मुकुंदा गवळ्याची नार करी सोळा सृंगार  झाली चरणावरी ।।३।।

हे शिवशंकर गिरिजा तनया - he shivshankar girija tanaya lyrics

हे शिवशंकर गिरिजा तनया, गणनायका प्रभुवरा शुभकार्याच्या शुभ प्रारंभी, नमन तुला ईश्वरा ||धृ|| प्रसन्न होऊन विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे तुझ्या कृपेने यश कीर्तिचा, बहर येऊ दे जरा ||१|| वंदन करुनी तुजला देवा, रसिकजनांची करितो सेवा कौतुक होउनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा ||२||

ये हंसा वरती बसून शारदे - ye hansavarti basun sharde lyrics

ये हंसा वरती बसून शारदे, मयुरा वरती बसून ...||धृ|| नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालून मुक्ताफळं कटी कंबरपट्टा कसुन शारदे मयुरा वरती बसुन ...||१|| करी घेऊनीया विना, करी मंजुळ गायना ये सभेमध्ये हसून शारदे मयुरा वरती बसून ...||२|| तुका म्हणे ब्रम्हनंदीनी, मम् ह्रदयी विराजुनी ये अंतर्ज्ञाना ठसुन शारदे मयुरा वरती बसून ...||३||

हा नंदाचा कान्हा - ha nandacha kanha lyrics

दिवस उगवुनी किती वर आला मथुरेला बाजार निघाला...!! हा नंदाचा कान्हा घालितो कसा धिंगाणा कळी लावितो नाना या गोकुळी पहा ना ||धृ|| मथुरेचा बाजार अडवितो, गोपिंशी हा खेळ खेळतो पळु पळु केले याने, दह्या दुधाची दैना ||१|| लेकी सुना गवळ्यांच्या ललना, करी सदा त्यांच्यांशी वल्गना हशील मांगता कसुनी जोराने ऐकेना कोणा ||२|| वेणू सदा वाजवी कुंजवना, मुरली मधुनी उडवी तो ताना मत्थ्यानीला उठुनी पळते गौळणी या आडराना ||३||

गुरू चरण - guru charan lyrics

चरण तुझे गुरुराया हिच माझी देवपूजा ||धु|| गुरु चरणाची माती, हिच माझी भागीरथी ||१|| गुरुचरणाचा बिंदू, हाची माझा शिर सींधू ||२|| गुरु चरणाचे ध्यान, हेची माझे संध्या स्नान  निशी दिन शिर पायी, गुरुविण दैवत नाही ||३|| हिच माझी देव पूजा हिच माझी देव पूजा..!!

दत्त दर्शन ला जायचं जायचं - datt darshan la jayach jayach lyrics

दत्त दर्शनला जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या मावेना ||धृ|| गेलो गाणगापूरी थेट घेतली दत्ताची भेट  या या भेटीची हौस पुरी होईल ||१|| नजरबंदीचा हा खेळ खेळे सदगुरू प्रेमळ  या या खेळीचा खेळ पुरा होईना ||२|| रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर या या नजरेचा खेळ पुरा होईना ||३|| हंडीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग  या या गारुड्याचा खेळ पुरा होईना ||४||