यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी - yamunechya tiri lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।

बारा सोळा गौळ्याच्या नरी ।
त्या नटूनी चालल्या मथूरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।
 
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।।२।।


एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सृंगार 
झाली चरणावरी ।।३।।

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा