मी उघडताच खिडकी - mi ughadtach khidaki lyrics
मी उघडताच खिडकी, साई दर्शन मज व्हावे
माझ्या घरा... माझ्या घरा...
माझ्या घरासमोर साईनाथ तुझे मंदिर असावे || धृ ||
तुझी आरती होताना, साईशब्द यावा कानी
मी डोळे मिटताना, तुझी मूर्ती यावी ध्यानी
साई भजन म्हणताना तु भजनाला यावे
मी उघडताच खिडकी साईदर्शन मज व्हावे ॥१॥
तु येता जाताना, मज दिसावा बाबा
तुझ्या जवळ तीर्थ सारी, आहे काशी काबा
मी दास तुझा साई तु मालक बनाने
मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे ॥२॥
जो तुज जवळी आला, तो साई तुझा झाला
जीवनामध्ये त्याच्या, ना काही कमी त्याला
तुझ्या पालखीत फकिराला तु शिर्डीला न्यावे
मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे ॥ ३ ॥
Comments
Post a Comment