हे शिवशंकर गिरिजा तनया - he shivshankar girija tanaya lyrics
हे शिवशंकर गिरिजा तनया, गणनायका प्रभुवरा
शुभकार्याच्या शुभ प्रारंभी, नमन तुला ईश्वरा ||धृ||
प्रसन्न होऊन विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश कीर्तिचा, बहर येऊ दे जरा ||१||
वंदन करुनी तुजला देवा, रसिकजनांची करितो सेवा
कौतुक होउनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा ||२||
Comments
Post a Comment