हा नंदाचा कान्हा - ha nandacha kanha lyrics
दिवस उगवुनी किती वर आला
मथुरेला बाजार निघाला...!!
हा नंदाचा कान्हा घालितो कसा धिंगाणा
कळी लावितो नाना या गोकुळी पहा ना ||धृ||
मथुरेचा बाजार अडवितो, गोपिंशी हा खेळ खेळतो
पळु पळु केले याने, दह्या दुधाची दैना ||१||
लेकी सुना गवळ्यांच्या ललना, करी सदा त्यांच्यांशी वल्गना
हशील मांगता कसुनी जोराने ऐकेना कोणा ||२||
वेणू सदा वाजवी कुंजवना, मुरली मधुनी उडवी तो ताना
मत्थ्यानीला उठुनी पळते गौळणी या आडराना ||३||
Comments
Post a Comment