जाऊदे घट भरण्या यमुनेला - jaudet ghat bharnya yamunela lyrics
जाऊदे घट भरण्या यमुनेला,
मला रे अडवू नको नंदलाला ||धृ||
पिचकारी मध्ये भरुनी रंग,
रंगाने माझे भिजवले अंग ||१||
डोईवर माझ्या दुधाचा माठ,
घट चढताना दुखतीया पाठ ||२||
एका जनार्दनी गौळण राधा,
राधा लागली हरी चरणाला ||३||
Comments
Post a Comment