हौस भारी माझ्या मनाला - hous bhari Mazya manala lyrics
हौस भारी माझ्या मनाला, माझ्या मनाला
त्या देवाला जायची, त्या देवाला जायाची
विठुरायाची पांडुरंगाची पंढरी बघायची ||धृ||
भक्त पुंडलिकासाठी, मूर्ती सावळी हो आली
श्री ज्ञानोबा भेटती, त्या पिंपळाच्या खाली
देहू गावी, भेट घ्यायची, त्या तुकोबारायाची ||१||
थोर चंद्रभागे तिरी, एकनाथाची कावड
त्या सावंता माळ्याच्या, मला भाजीची आवड
तुकोबाला, नामदेवाला, हार फुले व्हायाची ||२||
विष्णू देवाने तारिले, त्या भक्त प्रल्हादाला
तसा तारील हो मजला, माझा पांडुरंग मला
श्रीरंगाला, गोपाळाला, इच्छा ही सांगायची ||३||
Comments
Post a Comment