Posts

Showing posts from May, 2024

गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय - Gouri Hara Dinanatha Lyrics

 गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पायरुसू,  नको माझ्या देवा , तूच माझी माय दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत एकरूप आपण दोघे , दूध आणि साय तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय दास म्हणे देवा माझी अन्य नाही सोयतु तूझ्याविना देईल कोन मोक्ष अंतराय 

हारानं फुलानं पालखी सजवली - Haran Fulan Palkhi sajavali Lyrics

हारानं फुलानं लिंबाच्या डहाळ्यानं  पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली ||धृ|| कुणी आणा ग हळदीकुंकू आणा  माझ्या आईचा आईचा मळवट भरा  माझ्या देवीचा देवीचा मळवट भरा ||१|| कुणी आणा ग साडी चोळी आणा  माझ्या आईची आईची ओटी भरा  माझ्या देवीची देवीची ओटी भरा ||२|| कोणी बोलवा बोलवा गोंधळला माझ्या आईचा आईचा गोंधळ घाला  माझ्या देवीचा देवीचा गोंधळ घाला ||३|| आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी  आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नामा संबळ 

नाम तुझे बरवेगा शंकरा - Naam tuze barvega shankara Lyrics

कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणिंद्र माया मुकुटी झळाळी  कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुजविण शंभू मज कोण तारी नाम तुझे बरवे गा शंकरा  हर हर बरवे गा देवा  शंकरा शंकरा शंकरा ||धृ|| गाईल्या ऐकील्या एका वैष्णवा घरी  रामनामी तरीलो नेनो किती  हर हर बरवे गा देवा  शंकरा शंकरा शंकरा ||१|| ऐसा आनंद सदा राउळी,  विष्णुदास नामा पंढरपुरी  हर हर बरवे गा देवा  शंकरा शंकरा शंकरा ||२|| हर हर शंकर नमामि शंकर हे शिवशंकर शंभो

भजन करी महादेव - Bhajan Kari Mahadev Lyrics

भजन करी महादेव, राम पुजी सदाशिव ||धृ|| दोन्ही देव एकची पाही, तया ऐसे दुजे नाही ||१|| शिवा राम नाही भेद, दोन्ही देव ते हे सिद्ध ||२|| जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक ||३||

स्वामी समर्थ भजन - Uajaluni aal abhal Lyrics

शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव  उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अनं गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी ||धृ|| वारुळातुनी योगीराज हा गावामध्ये आला,  रामाच्या पारी वासुदेव हा जागवितो लोकांना,  उठा उठा रे गावकऱ्यांनो चमत्कार झाला,  स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला ||१|| आपल्या दारी चालून आला नाथांचा हा नवनाथ,  या भक्तांच्या शिरावरती ठेवी वरदाचा हात, येड्या वाणी वागु नको रं लाग चरणाला ||२|| बघ ही काया दोन घडीची, पोकळ माया नाही कामाची, लय झाली रं चैन जीवाची करितो सेवा दिगंबराची, ध्यानी ठेव रं, ऐकून घे रं, माझ्या शब्दाला ||३|| तीन मुखांचा दत्तगुरु बघ, ब्रम्हा विष्णू महेश हा, जाणून घे रं भल्या माणसा, वासुदेवाचा संदेश हा,  तिन्ही जगाचा त्राता त्राता, तरी आम्हाला ||४|| दत्त अवतार स्वामी महाराज, दिन दुबळ्यांची राखीतो लाज  कीर्तीचा डंका जगात वाज, नाव स्वामींचे भारित गाज  दत्त गुरूंचे रूप हे साज, दहा खंडाला ||५|| देवाच्या नावानं दान पावल, भवानीच्या नावानं दान पावलं  दत्ताच्या नावानं दान पावलं, दान पावलं

लिंबाखाली प्रकट झाला - Limbakhali Prakat Zala Lyrics

लिंबाखाली प्रकट झाला, लिंबाखाली प्रकट झाला  ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रकट झाला ||धृ|| गोदामाईच्या तीरावर, एकदिन घडले अपार, निर्गुण झाला साकार, आठ वर्षाचा बाळ, बाळ हा चिमुकला ||१|| नामा झाला नाममय, कबीर झाले राममय, साई झाले समद्वय, बाबा झाले समद्वय,  मंदिर मस्जिद त्याने संगम केला ||२|| शिंपीयाचे पोटी नामा जन्मलेला, कमल दलातून कबीर उमगला,  ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रकट झाला ||३||

धन्य अंजनीचा सुत - Dhany anjanicha Suta Lyrics

धन्य अंजनीचा सुत, त्याचे नाव हनुमंत ||धृ|| ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटवली ||१|| ज्याने द्रोणागिरी जो आणिला, त्याने लक्ष्मण वाचवला ||२|| ऐसा मारुती उपकारी, तुका जोड चरणावरी ||३||

त्या गुरुरायाची माय माऊलीची - Tya gururayachi May maulichi Lyrics

त्या गुरुरायाची माय, माऊलीची ऐकावी ही थोरवी, सुख्या झाडाला गजाननाने फोडली पालवी ||धृ|| महाराजांनी ठाई ठाई दाविले चमत्कार, गाव कोंडूनी हित शिंप्याला झाला साक्षात्कार, झाड आंब्याचे ते कैक दिवसाचे ते वाऱ्यावरती डोलवी ||१|| उष्टे अन्न खाता स्वामींना संकट करि विरोध, चराचरी ब्रह्म नांदतो केला तयाला बोध, उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या तिरस्कार तो घालवी ||२|| लीला स्वामींची ती ऐसी कोरडी विहीर भरली, नौका ती भक्तांची हो नदीत बुडताना तरली, माया लावीतो जो वाट दवीतो जो दुःखी मनाला फुलवी ||३|| गुरूंच्या पुण्याईने रोग बरे ते झाले, किमया केली त्या गजाननाने नंदनवन फुलविले, गार छाया ज्याची गोड माया ज्याची  जणू पराग आई ती बोलवी ||३||

माझ्या लाडाच्या पाहुण्याला - Mazya Ladachya Pahunyala Lyrics

माझ्या लाडाच्या पाहुण्याला,  पाठ बसाया देईन, आनं एकवीस मोदकाचं, ताट पुढ्यात ठेवीन || धृ || असा देवांचा हा देव, तया माझा नमस्कार, त्याला वाहून फुलहार, त्याचा करीन सत्कार, भक्ती भावाने माथ्यावर, दुर्वा फुले मी वाहिन || 1 || माझे त्रिवार वंदना, माझ्या गणेश देवाला, नित्य नेमाने देवाची, रोज करीन मी पूजा, रूप डोळ्याने पाहिन, त्याचे दर्शन घेईन || 2 || मला नको त्या धनराशी, मला नको ती संपत्ती, माझ्या घरात एकनाथा,  नित्य नांदु दे सुख शांती, नथमस्तक होईन, त्याचे दर्शन घेईन || 3 ||

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी - Sundar Te Dhyan Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी  कर कटेवरी ठेवोनिया | तुळशीहार गळा कासे पितांबर  आवडे निरंतर हेची ध्यान | मकर कुंडले तळपती श्रवणी  कुंठी कौस्तुभ मणी विराजित | तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख  पाहिन श्रीमुख आवडीने ||

रूप पाहता लोचनी - Roop Pahata Lochani Lyrics

रूप पाहता लोचनी  सुख झाले हो साजणी  तो हा विठ्ठल बरवा  तो हा माधव बरवा  बहुत सुकृताची जोडी  म्हणूनी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर  बापा रखुमा देवीवर

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा - Keshva Madhava tuzya namat re gowa Lyrics

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्यासारखा तूच देवा,  तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा वेडा होऊन भक्तीसाठी,  गोपगड्यांसह यमुनाकाठी,  नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा वीर धनुर्धर पार्थासाठी,  चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

Chanda Hai Tu, Mera Suraj Hai Tu Lyrics - चंदा है तू, मेरा सूरज है तू ओ मेरी आँखों का तारा है तू

 चंदा है तू, मेरा सूरज है तू ओ मेरी आँखों का तारा है तू जीती हूँ मैं बस तुझे देखकर इस टूटे दिल का सहारा है तू तू खेले खेल कई, मेरा खिलोना है तू -२ जिससे बँधी हर आशा मेरी मेरा वो सपना सलोना है तू नन्हा सा है कितना सुंदर है तू छोटा सा है कितना प्यारा है तू चंदा है तू, मेरा सूरज है तू मुन्ने तू खुश है बड़ा, तेरे गुड्डे की शादी है आज -२ मैं वारी रे मैं बलिहारी रे घूँघट में गुड़िया को आती है लाज यूँही कभी होगी शादी तेरी दूल्हा बनेगा कुंवारा है तू चंदा है तू, मेरा सूरज है तू पुर्वाई वन में उड़े, पंछी चमन में उड़े -२ राम करे कभी हो के बड़ा तू बनके बादल गगन में उड़े जो भी तुझे देखे वो ये कहे किस माँ का ऐसा दुलारा है तू चंदा है तू, मेरा सूरज है तू Chanda Hai Tu, Mera Suraj Hai Tu O Meri Aankho Ka Tara Hai Tu Chanda Hai Tu, Mera Suraj Hai Tu O Meri Aankho Ka Tara Hai Tu Chanda Hai Tu, Mera Suraj Hai Tu O Meri Aankho Ka Tara Hai Tu Jiti Hun Mai Bas Tujhe Dekhakar Is Tute Dil Ka Sahara Hai Tu Tu Khele Khel Kai, Mera Khilona Hai Tu Tu Khele Khel Kai, Mera Khilona Hai Tu Jisase Bandhi Har Aasha Meri M...