माझ्या लाडाच्या पाहुण्याला - Mazya Ladachya Pahunyala Lyrics

माझ्या लाडाच्या पाहुण्याला,
 पाठ बसाया देईन,
आनं एकवीस मोदकाचं,
ताट पुढ्यात ठेवीन || धृ ||

असा देवांचा हा देव, तया माझा नमस्कार,
त्याला वाहून फुलहार, त्याचा करीन सत्कार,
भक्ती भावाने माथ्यावर, दुर्वा फुले मी वाहिन || 1 ||

माझे त्रिवार वंदना, माझ्या गणेश देवाला,
नित्य नेमाने देवाची, रोज करीन मी पूजा,
रूप डोळ्याने पाहिन, त्याचे दर्शन घेईन || 2 ||

मला नको त्या धनराशी, मला नको ती संपत्ती,
माझ्या घरात एकनाथा,
 नित्य नांदु दे सुख शांती,
नथमस्तक होईन, त्याचे दर्शन घेईन || 3 ||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा