त्या गुरुरायाची माय माऊलीची - Tya gururayachi May maulichi Lyrics
त्या गुरुरायाची माय, माऊलीची ऐकावी ही थोरवी,
सुख्या झाडाला गजाननाने फोडली पालवी ||धृ||
महाराजांनी ठाई ठाई दाविले चमत्कार,
गाव कोंडूनी हित शिंप्याला झाला साक्षात्कार,
झाड आंब्याचे ते कैक दिवसाचे ते वाऱ्यावरती डोलवी ||१||
उष्टे अन्न खाता स्वामींना संकट करि विरोध,
चराचरी ब्रह्म नांदतो केला तयाला बोध,
उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या तिरस्कार तो घालवी ||२||
लीला स्वामींची ती ऐसी कोरडी विहीर भरली,
नौका ती भक्तांची हो नदीत बुडताना तरली,
माया लावीतो जो वाट दवीतो जो
दुःखी मनाला फुलवी ||३||
गुरूंच्या पुण्याईने रोग बरे ते झाले,
किमया केली त्या गजाननाने नंदनवन फुलविले,
गार छाया ज्याची गोड माया ज्याची
जणू पराग आई ती बोलवी ||३||
Comments
Post a Comment