स्वामी समर्थ भजन - Uajaluni aal abhal Lyrics
शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव
उजळून आलं आभाळ रामाच्या पारी,
अनं गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी ||धृ||
वारुळातुनी योगीराज हा गावामध्ये आला,
रामाच्या पारी वासुदेव हा जागवितो लोकांना,
उठा उठा रे गावकऱ्यांनो चमत्कार झाला,
स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला ||१||
आपल्या दारी चालून आला नाथांचा हा नवनाथ,
या भक्तांच्या शिरावरती ठेवी वरदाचा हात,
येड्या वाणी वागु नको रं लाग चरणाला ||२||
बघ ही काया दोन घडीची, पोकळ माया नाही कामाची,
लय झाली रं चैन जीवाची करितो सेवा दिगंबराची,
ध्यानी ठेव रं, ऐकून घे रं, माझ्या शब्दाला ||३||
तीन मुखांचा दत्तगुरु बघ, ब्रम्हा विष्णू महेश हा,
जाणून घे रं भल्या माणसा, वासुदेवाचा संदेश हा,
तिन्ही जगाचा त्राता त्राता, तरी आम्हाला ||४||
दत्त अवतार स्वामी महाराज, दिन दुबळ्यांची राखीतो लाज
कीर्तीचा डंका जगात वाज, नाव स्वामींचे भारित गाज
दत्त गुरूंचे रूप हे साज, दहा खंडाला ||५||
देवाच्या नावानं दान पावल, भवानीच्या नावानं दान पावलं
दत्ताच्या नावानं दान पावलं, दान पावलं
Comments
Post a Comment