हारानं फुलानं पालखी सजवली - Haran Fulan Palkhi sajavali Lyrics
हारानं फुलानं लिंबाच्या डहाळ्यानं
पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली ||धृ||
कुणी आणा ग हळदीकुंकू आणा
माझ्या आईचा आईचा मळवट भरा
माझ्या देवीचा देवीचा मळवट भरा ||१||
कुणी आणा ग साडी चोळी आणा
माझ्या आईची आईची ओटी भरा
माझ्या देवीची देवीची ओटी भरा ||२||
कोणी बोलवा बोलवा गोंधळला
माझ्या आईचा आईचा गोंधळ घाला
माझ्या देवीचा देवीचा गोंधळ घाला ||३||
आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी
आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नामा संबळ
Comments
Post a Comment