नाम तुझे बरवेगा शंकरा - Naam tuze barvega shankara Lyrics
कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणिंद्र माया मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुजविण शंभू मज कोण तारी
नाम तुझे बरवे गा शंकरा
हर हर बरवे गा देवा
शंकरा शंकरा शंकरा ||धृ||
गाईल्या ऐकील्या एका वैष्णवा घरी
रामनामी तरीलो नेनो किती
हर हर बरवे गा देवा
शंकरा शंकरा शंकरा ||१||
ऐसा आनंद सदा राउळी,
विष्णुदास नामा पंढरपुरी
हर हर बरवे गा देवा
शंकरा शंकरा शंकरा ||२||
हर हर शंकर नमामि शंकर हे शिवशंकर शंभो
Comments
Post a Comment