Posts

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥  उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोयरा ॥२॥  पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥  उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥

उठा उठा स्वामी समर्थ | Uatha utha swami samarth lyrics

उठा उठा स्वामी समर्थ । ओवाळीते पंचारती। पंचप्राण घेऊन आले। स्वामींच्या चरणी॥धृ॥  समर्थ, जय जय स्वामी समर्थ । परब्रम्ह आज आले भक्तांच्या सामोरी ।  मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी ।  हरपले देह भान लागलेसे ध्यान शरण रे आलो आम्ही। नेत्र पाणावती पंचप्राण ॥१॥ जगाचा कल्याणासाठी संतांच्या विभुती ।  स्वामी समर्थाच्या पायी येत असे प्रचीती ।  पुजेसाठी नाही काही। फक्त जीव भोळा।  पामर या भक्तासाठी। यावे कृपामूर्ती ||२|| देह आज विरोनी गेला। स्वामी तुम्हा पुढती ।  मूर्ती मंत पाहीली मी जागणारी मूर्ती।  मागणे हे सरले ध्यान लागताना। स्वामी समर्थाच्या पायी। स्वर्ग साथ देती ||३||

काजळामुळं दिसतय काळं | Kajlamul disty kaal lyrics

काजळामुळं दिसतय काळं नंदाच करट गं बाई बाई नंदाच करट अगं बाई बाई बाई ,  अगं बाई बाई बाई नंदाच करट काजळामुळं दिसतय काळं नंदाच करट ग बाई बाई नंदाच करट  गोरस घेऊनी मथुरेशी जाता अडवितो आमची वाट  गाईच वासराच उपटीत होत खुट  अगं बाई बाई बाई...... घागर घेउन पाणीयशी जाता अडवितो आमची वाट  पदराला ओढीतो किती बाई हा चावट अगं बाई बाई बाई...... एका जनार्दनी पुर्ण कृपेने सावळा बाई तुझा धीट  राधेला अडवितो किती बाई हा वात्रट  अगं बाई बाई बाई......

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा

वारकरी पंढरीचा I धन्य धन्य जन्म त्याचा II धृ II  नेमे जाय पंढरीसी I कदा न चुके त्या नामासी II १ II त्या आषाढी कार्तिकी I सदा नाम गाय मुखी II २  II एका जनार्दनी  करी वारी I धन्य तोचि बा संसारी II ३ II

नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची

नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची. बाई ठिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची, शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा. राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा. शर्त झाली बाई याची निर्लजपणाची, या कान्हाची, या कृष्णाची. तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची. पाणीयाशी जात बाई, वाटेवरी उभा कान्हा. सोड देवा पदर माझा, नार आहे परक्याची. या कान्हा ची, या कृष्णाची. तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची. एका जनार्दनी गवळण हासुनी, हरी चरणाशी मिठी मारूनी. फिटली ग बाई माज्या, हौस या मनाची. या कान्हाची, या कृष्णाची. तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची. नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची. बाई ठिपक्याची. तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची. लिरिक्स: संत एकनाथ महाराज कृष्ण गवळण मराठी 

मोरया शरण तुझ्या चरणी Morya Sharan tuzya Charani lyrics

शिणले तन मन वाट पाहुनी येशील कधी सदनी मोरया शरण तुझ्या चरणी || विघ्न हारिसी सकल जागचे मंगल होते भक्त गणांचे या वाचनाला जाग गणेश तुझ वीण नाही कोणि || दास तुझा मी शत जन्मीचा तु प्रतिपालक या श्वासांचा आज परंतु नाही दर्शन आले मन भरुनी || अजाण आम्ही जाणुन घे रे अप्रधाला पोटी घे रे साद ऐकुनी धावत ये रे हीच आस मनी ||

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला Aai bhavani tuzya krupene

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला  अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला  आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी  आज गोंधळाला ये .... गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी... माझ्यावरी... जागवितो रात सारी आज गोंधळाला ये .... गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं अग सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी (2 times) अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये अं...