आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला Aai bhavani tuzya krupene

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला 

अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला 
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी 
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी... माझ्यावरी... जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....


गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं


अग सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी (2 times)

अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये


अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं

सप्तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा