उठा उठा स्वामी समर्थ | Uatha utha swami samarth lyrics
उठा उठा स्वामी समर्थ । ओवाळीते पंचारती।
पंचप्राण घेऊन आले। स्वामींच्या चरणी॥धृ॥
समर्थ, जय जय स्वामी समर्थ ।
परब्रम्ह आज आले भक्तांच्या सामोरी ।
मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी ।
हरपले देह भान लागलेसे ध्यान
शरण रे आलो आम्ही। नेत्र पाणावती पंचप्राण ॥१॥
जगाचा कल्याणासाठी संतांच्या विभुती ।
स्वामी समर्थाच्या पायी येत असे प्रचीती ।
पुजेसाठी नाही काही। फक्त जीव भोळा।
पामर या भक्तासाठी। यावे कृपामूर्ती ||२||
देह आज विरोनी गेला। स्वामी तुम्हा पुढती ।
मूर्ती मंत पाहीली मी जागणारी मूर्ती।
मागणे हे सरले ध्यान लागताना।
स्वामी समर्थाच्या पायी। स्वर्ग साथ देती ||३||
Comments
Post a Comment