काजळामुळं दिसतय काळं | Kajlamul disty kaal lyrics
काजळामुळं दिसतय काळं नंदाच करट गं बाई बाई नंदाच करट
अगं बाई बाई बाई , अगं बाई बाई बाई नंदाच करट
काजळामुळं दिसतय काळं नंदाच करट ग बाई बाई नंदाच करट
गोरस घेऊनी मथुरेशी जाता अडवितो आमची वाट
गाईच वासराच उपटीत होत खुट
अगं बाई बाई बाई......
घागर घेउन पाणीयशी जाता अडवितो आमची वाट
पदराला ओढीतो किती बाई हा चावट
अगं बाई बाई बाई......
एका जनार्दनी पुर्ण कृपेने सावळा बाई तुझा धीट
राधेला अडवितो किती बाई हा वात्रट
अगं बाई बाई बाई......
Comments
Post a Comment