Posts

Showing posts from January, 2025

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥  उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोयरा ॥२॥  पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥  उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥

उठा उठा स्वामी समर्थ | Uatha utha swami samarth lyrics

उठा उठा स्वामी समर्थ । ओवाळीते पंचारती। पंचप्राण घेऊन आले। स्वामींच्या चरणी॥धृ॥  समर्थ, जय जय स्वामी समर्थ । परब्रम्ह आज आले भक्तांच्या सामोरी ।  मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी ।  हरपले देह भान लागलेसे ध्यान शरण रे आलो आम्ही। नेत्र पाणावती पंचप्राण ॥१॥ जगाचा कल्याणासाठी संतांच्या विभुती ।  स्वामी समर्थाच्या पायी येत असे प्रचीती ।  पुजेसाठी नाही काही। फक्त जीव भोळा।  पामर या भक्तासाठी। यावे कृपामूर्ती ||२|| देह आज विरोनी गेला। स्वामी तुम्हा पुढती ।  मूर्ती मंत पाहीली मी जागणारी मूर्ती।  मागणे हे सरले ध्यान लागताना। स्वामी समर्थाच्या पायी। स्वर्ग साथ देती ||३||

काजळामुळं दिसतय काळं | Kajlamul disty kaal lyrics

काजळामुळं दिसतय काळं नंदाच करट गं बाई बाई नंदाच करट अगं बाई बाई बाई ,  अगं बाई बाई बाई नंदाच करट काजळामुळं दिसतय काळं नंदाच करट ग बाई बाई नंदाच करट  गोरस घेऊनी मथुरेशी जाता अडवितो आमची वाट  गाईच वासराच उपटीत होत खुट  अगं बाई बाई बाई...... घागर घेउन पाणीयशी जाता अडवितो आमची वाट  पदराला ओढीतो किती बाई हा चावट अगं बाई बाई बाई...... एका जनार्दनी पुर्ण कृपेने सावळा बाई तुझा धीट  राधेला अडवितो किती बाई हा वात्रट  अगं बाई बाई बाई......

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा

वारकरी पंढरीचा I धन्य धन्य जन्म त्याचा II धृ II  नेमे जाय पंढरीसी I कदा न चुके त्या नामासी II १ II त्या आषाढी कार्तिकी I सदा नाम गाय मुखी II २  II एका जनार्दनी  करी वारी I धन्य तोचि बा संसारी II ३ II