सांज सकाळी भलत्या वेळी sanj sakali bhaltya veli lyrics
सांज सकाळी भलत्या वेळी,
घरामध्ये घुसतो कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो
दही दूध खाऊनी माठ फोडीतो मस्करी माझी करितो ||धृ||
उंच माळ्यावरी बांधीले शिंके, हात कसा पुरतो
कान्हाचा बाई हात कसा पुरतो
मांजर म्हणुनी त्यासी मरिता मजवरी गुरकावतो ||१||
जात मी होते यमुनेच्या पाण्या, वाट माझी धरितो
कान्हा ग बाई वाट माझी धरीतो
माझा चेंडू हरवला राधे तुजं जवळी दिसतो ||२||
जिकडे पहावे तिकडे हरी, एकची दिसतो
हरि ग बाई एकची दिसतो
म्हणे मुक्ताबाई न्हवे गडे कृष्ण हा पांडुरंग दिसतो ||३||
Comments
Post a Comment